पेन्शन अदालत पणजी येथे 17 जुलै रोजी
सिंधुदुर्गनगरी
पोस्टमास्तर जनरल, क्षेत्रीय कार्यालय गोवा, पणजी कार्यालयमध्ये टपाल विभागातील पेन्शन धारकांसाठी पेन्शन अदालत दि. 17 जुलै रोजी दु. 3 वाजता आयोजित करण्यात करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधिक्षक यांनी दिली आहे.
टपाल पेन्शनधारकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी, गोवा पोस्टल क्षेत्र (ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील गोवा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे.) निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांच्या सेवेत असताना मृत्यू झालेला आहे.ज्यांचे 3 महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही अशा प्रकरणाचा डाक पेन्शन अदालत मध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकारी इत्यादी आणि निती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्तीवेतनधारक आपले अर्ज श्री. महेश एन, लेखा अधिकारी, सचिव, पेन्शन अदालत क्षेत्रीय कार्यालय पणजी गोवा- 403001 या पत्यावर दि. 7 जुलै 2023 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.