You are currently viewing वारकरी संप्रदायातील मंडळींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन

वारकरी संप्रदायातील मंडळींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ह.भ.प. कुर्ले महाराजांचा सत्कार..

 

वेंगुर्ले :

 

वेंगुर्ला तालुक्यातील ह. भ. प. कुर्लेबुवा आणि वारकरी संप्रदायातील मंडळींना चांदेरकर विठ्ठल मंदिर येथे भाजपा कार्यकर्त्ये यांनी एकत्रित येत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून कुर्लेबुवा यांचा निवृत्त शिक्षक व साहित्यिक अजित राऊळ यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

 

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप व निवृत्त शिक्षक साहित्यिक अजित राऊळ , विश्व हिंदू परिषदेचे अरुण गोगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसन्ना देसाई यांनी केले.

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू येथे आवर्जून उपस्थित राहून महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या कार्याची प्रशंसा केली होती, त्याची आठवण करून देताना देसाई म्हणाले मोदीजींनी संत तुकोबांचा जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा…. हा अभंग मराठीत म्हणून दाखवला होता व वारकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा