*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*भेट….!*
चला जाऊ पंढरीला
देवाचिया दर्शनाला…
जशी एखादी सासुरवाशीण माहेरी जायला आतुर असते ,
तसा प्रत्येक वारकरी विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी आसुसलेला असतो. व्याकुळ झालेला असतो. आषाढी एकादशी, पंढरपूर आणि अठ्ठावीस युगे विटेवरी ,कर कटी ठेवून ऊभा असलेला पांडुरंग याचे अनन्य साधारण महत्व
वारकर्यांच्या आयुष्यात असते.
या टाळ मृदुंगाच्या नादात आणि पुंडलीक वरदे हारी विठ्ठल नामाच्या गजरात चाललेल्या या दिंडीतल्या वारकर्यांविषयी मला परम् आदर आहे.ह्या सर्वधर्मसमभाव एकवटलेल्या वारीत, ना कुणाला आमंत्रण असते ना कुणाला मज्जाव असतो.असतो तो फक्त एकच भाव
‘चला जाऊ पंढरीला’
माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला एक प्रश्न नेहमी पडतो,
कुठून येते यांना शक्ती इतक्या ,कधी ऊन कधी पाऊस असलेल्या वातावरणात ,पंढरीची ही वाट चालण्या करिता.?
त्यांच्यासाठी हा भक्तीच्याही पलीकडचा असा अनुभव असेल.ते नाचतात,ते गातात,ते खेळतात ,ते धुंद असतात,
वय विसरलेले असतात,चिंता, मोह, माया पाश सारे कुठेतरी वाहून आलेले असतात .एकच ध्यास.माऊलीचा.
पंढरीला जायाचा.
आज मनात येतं,पंच्याहत्तर वर्षात मी एकदाही हा अनुभव का नाही घेतला?वारी पाहिली ,वारी ऐकली ,पण वारी अनुभवली नाही.जगभर प्रवास केला ..पंढरपूरही पाहिले.
देहु आळंदीलाही भेट दिली. पण सारा डीलक्स प्रवास.
ती भेट नव्हती.ती visit होती.त्यांत भेटीलागी जीवा लागलीसे आस..हा भाव नव्हता.
पूर्णीमेचा चंद्र चकोरा जीवन
तैसे माझे मन वाट पाहे ।। ही व्याकुळता नव्हती…
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबाची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा
वाली दामाजीचा..
अशा ओव्यांतून,अभंगातून पांडुरंग ऐकला.
तुकारामाची बुडवलेली गाथा इंद्रायणीतून तारली,
एकनाथाच्या घरी पाणी भरले,जनाबाईची लुगडी धुतली,
कबीराचे शेले विणले या कथा मनापासून ऐकल्या.वाचल्या त्यात
नवलाचा ,आश्चर्याचाच भाग अधिक होता.त्यावेळीही एकदा
चुकारपणे मनी आले होते,माझी कुठलीच कामे हा पांडुरंग
काहून नाही करत? दिसत नाही का याला मी भाराखाली वाकलेली…माझ्यावेळीच का हा फेवीकाॅल लावून विटेवर ऊभा राहतो…
पण उभं आयुष्य सरलं आणि काल अचानक याचं ऊत्तर मिळालं. खरं म्हणजे मी आणि तो एकरंगी.एकवर्णी.माझं
आणि त्याचं हे रंगाचं नातं किती घट्ट! किती जवळचं..!!मग एकदम जाणवलं तो तर माझ्यातच आहे.माझ्यातच सामावलेला आहे. इतकी वर्षं जावी लागली हे कळायला?पण म्हणतात ना काखेत कळसा नि गावभर वळसा..
देव्हार्यातल्या, विठुरखुमाईच्या मूर्तीवर मोगर्याची फुलं वाहिली आणि त्या कृष्णधवल दृष्यात, माझा विठु प्रेमाने हंसला… म्हणाला अग! मी तुझ्याबरोबरच होतो. आहे. हे साक्षात् माउलीचे अश्वासन होते.(कुण्या मंत्र्याचे नव्हते).धन्य झाले मी..
वाटले, कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला
अंत:पार याचा…
मनात आले ,आतां संधीप्रकाश दाटला आहे.अंधार व्हायच्या आत जाऊया का पंढरीला..
एकदा तरी म्हणूया की त्याला.”.थँक यू…”
राधिका भांडारकर पुणे.
*संवाद मिडिया*
*🧑🏻🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*🏭यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏭*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *💯 नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*उपलब्ध कोर्सेस*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिंग
🔹 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
*📖प्रमुख वैशिष्ट्ये📖*
*❇️3 वर्षांचा अभ्यासक्रम📖*
*❇️अनुभवी व तज्ञ प्राध्यापक🕺🏼*
*❇️उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
*❇️उत्तम निकालाची परंपरा🤷♂️*
*❇️नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार*🤝
*❇️💯 नोकरीची हमी👍🏻*
❇️ *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत💸*
🆓 *SC/ST* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण🆓*
*🚌बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध*
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…📝*
*भेट द्या –👇🏻*
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, ता.सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*www.sybespolytechnic.com*
*संपर्क -*
*☎️02363273535/273456*
*📲मोबा.9404598060*
*आमची प्रवेश केंद्रे -:*
*कुडाळ प्रवेश केंद्र*
माने-जी क्रिएशन, पीएनबी बँकेजवळ, कुडाळ, ता.कुडाळ
9403053303 / 9403163639
*माणगाव प्रवेश केंद्र*
कदम कॉम्प्लेक्स, हायस्कूल रोड, माणगाव तिठा, माणगाव, ता.कुडाळ
9421718850 / 9158510198
*वेंगुर्ला प्रवेश केंद्र*
हायटेक कॉम्प्युटर, जि प शाळा नंबर 3 जवळ, वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला
9403101880 / 8879433307/ 9964056383
*मळेवाड प्रवेश केंद्र*
श्री गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा, मळेवाड, ता.सावंतवाडी
9422810151 / 9175017071
*दोडामार्ग प्रवेश केंद्र*
शॉप नं.4, टोपले कॉम्प्लेक्स, बॉम्बे टेक्सटाईलच्या मागे, बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग
9130003477 / 9145705988 / 9405990211
*Advt Link*
https://sanwadmedia.com/98446/
———————————————-