You are currently viewing अरण्येश्वर शाळेचा वारकरी मेळा..

अरण्येश्वर शाळेचा वारकरी मेळा..

पुणे :

 

संत ज्ञानियांची | वारकरी शाळा ||

बालचमू मेळा | शाळे दारी ||

अरण्येश्वर शिक्षण संस्थेत दि.२७/०६/२०२३ मंगळवारी शालेय पालखी सोहळा पार पडला.

बालवर्ग ते चौथी चे सर्व बालक छान वारकरी वेशात नटून आले होते.

बालवर्गातील काही विध्यार्थी विठ्ठल, रखुमाई बनून आले होते. सर्व मुले खूप गोड दिसत होते.

शाळेच्या प्रांगणात वारकरी मेळावा भरला होता. पालक कौतुकाने मुलाचे फोटो काढत होते. डोळे भरून हे वारकराऱ्यांनी सजलेले प्रांगण पाहत होते. आनंद घेत होते.

विठ्ठल, रखुमाईच्या प्रतिमेचे पुजन मा. मुख्याध्यापक सौ. अनिता गायकवाड व सौ. बोगम बाईंनी केले.सर्व शिक्षकांनी गणपती व विठ्ठलाची आरती म्हटली. ज्योती पुरकर बाईंनी माईकवर विठ्ठलाचे अभंग लावले. स्वाती सगर, जयमाला राऊत, बबिता कामठे, मनिषा ढवळे, कविता मुजुमले यांनी छान पालखी सजवली. मुलांनी छान पालख्या बनवून आणल्या होत्या.

मा. मुख्याध्यापक सौ. अनिता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ. वसुधा नाईक, कल्पना यादव, मोहोळ बाई, थिटे बाई, भोर बाई, कडलग बाई, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा पालखी सोहळा उत्तमरित्या संपन्न झाला.

अरण्येश्वर शाळेचा वारकरी मेळावा भरला

शाळेतील प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी आनंदला…

 

वसुधा नाईक, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा