You are currently viewing सामाजिक बांधिलकी जोपासणारा धन्वंतरी : डॉ. बबन बेलसरे..

सामाजिक बांधिलकी जोपासणारा धन्वंतरी : डॉ. बबन बेलसरे..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य डॉ.बबन बेलसरे वाढदिवसानिमित्त डॉ.नरेशचंद्र काठोळे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.* …
==============
*सामाजिक बांधिलकी जोपासणारा धन्वंतरी : डॉ. बबन बेलसरे..*
==============
आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून समाज कार्याला वाहून घेतलेले काही डॉक्टर अमरावती शहरात कार्यरत आहेत. त्यामध्ये अमरावतीचे डॉ.बबन बेलसरे यांचा वरचा क्रमांक आहे. बबन बेलसरे हे माझे कौटुंबिक मित्र आहेत. त्यांच्या माझा परिचय महाविद्यालयीन जीवनातील. मी तेव्हा अमरावतीला श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये शिकत होतो. माझे मित्र श्री मुरलीधर घाटोळ यांचे बबन बेलसरे हे मित्र. मुरलीच्या माध्यमातून बबन बेलसरे यांचा परिचय झाला .पुढे ते नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएस करण्यासाठी गेले .आमचा नागपूरचा चक्कर झाला की आमचा मुक्काम बबन बेलसरे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील खोलीमध्ये असायचा .मी बबन सराडकर,अशोक राणा, अशोक थोरात ही सगळी कवी मंडळी हक्काने बबनरावच्या वैद्यकीय खोलीवर थांबायचे. अर्थातच राहणे जेवणे खाणे पिणे सर्वांचा भार बबनराव सोसायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आंबेजोगाईला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काही वर्ष प्राध्यापकी केली आणि नंतर अमरावतीला दवाखाना प्रारंभ केला .आज बबनरावांनी व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यामध्ये आपला कायमचा ठसा उमटवला आहे .जयस्तंभ चौकातील पंचशील टॉकीज रोडवरील म्हणजे आताच्या बिग सिनेमा रोडवरील त्यांचे अन्नपूर्णा हॉस्पिटल म्हणजे हा चळवळीचा केंद्रबिंदू झाला आहे. अमरावती शहरातला हा असा डॉक्टर आहे की ज्यांनी आपला तळमजला सामाजिक चळवळीसाठी कायमचा उपलब्ध करून दिलेला आहे .आम्हाला कुठल्याही कार्यक्रम घ्यायचा असला तर आम्ही न विचारता बबन बेलसरे यांचा पत्ता देऊन टाकतो आणि बबनराव नुसतं सभागृह नाही तर येणाऱ्यांचे आदरतिथ्य करण्यामध्ये पुढाकार घेतात. खरं म्हणजे वैद्यकीय व्यवसाय सांभाळून खऱ्या अर्थाने सामाजिक काम करणं कठीणच काम आहे. पण बबनरावच्या रक्तात सामाजिक चळवळ मिसळून गेली आहे. आज प्रा.श्याम मानवांचा खूप मोठा नावलौकिक आहे .संमोहनाच्या क्षेत्रामध्ये तर त्यांचा कुणी हात धरत नाही .पण त्या प्रा.श्याम मानवांना संमोहनाच्या क्षेत्रात खऱ्या अर्थानं पुढं आणलं ते बबनराव यांनीच.त्याचे असे झाले की श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात अग्रेसर होते. त्यांनी मग संमोहनाच्या माध्यमातून लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचे ठरवले. त्यासाठी अमरावतीच्या विश्राम भवनामध्ये एक सभा त्यांनी बोलावली. टाटा मोटर्सचे मॅनेजर श्री विजय मोकाशी एडवोकेट गणेश हलकारे, लक्ष्मीकांत पंजाबी,डॉ.बबन बेलसरे आणि आम्ही सर्व एकत्र आलो. एकदम संमोहनाचा क्लास सुरू केला तर लोक येणार नाहीत. म्हणून त्यापूर्वी एक सात दिवसाची व्याख्यानमाला आम्ही करायचे ठरवले .त्यासाठी डॉ. बबन बेलसरे व विजय मोकाशी यांनी पुढाकार घ्यायचे ठरले .खर्च करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली .ही गोष्ट 1994 सालची .श्याम मानव तेव्हा खूपच चर्चेत होते. अंबापेठेतील मनीबाई गुजराती हायस्कूलच्या प्रचंड मोठ्या मैदानावर ही व्याख्यानमाला झाली. सुमारे दहा हजार लोक दररोज व्याख्यानाला असायचे. व्याख्यानमाला संपल्याबरोबर बबनराव बेलसरे यांच्या पुढाकाराने अमरावतीच्या महेश भवनात प्रा श्याम मानवांच्या पहिल्या संमोहन कार्यशाळेला सुरुवात झाली. बबनरावांनी त्यांच्या सर्व मित्रांना आवर्जून बोलावले .महेश भवनमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. ती प्रा.शाम मानव यांच्या जीवनातील पहिली संमोहन कार्यशाळा घडवून आणली ती बबनरावांनी .आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे भारतात प्रा. शाम मानव यांच्या संमोहन कार्यशाळा होत आहेत. पण त्यांची पानंमुळं बबनराव बेलसरे यांनी अमरावती पासून सुरू केलेली आहेत. सगळ्यात मला आवडणारा भाग म्हणजे त्यांनी सुरू केलेली प्रयास ही शाळा. विनायक कडू व सरिता कडू या जोडप्याने या कामासाठी वाहून घेतले होते .परंतु चळवळीला वाहून नुसतं चालत नाही. त्यासाठी लागते ते आर्थिक पाठबळ आणि ते आर्थिक पाठबळ देण्यासाठी बबनरावांनी विडा उचलला. संकल्प सोडला आणि आपल्या मित्रमंडळीतून अधिकारी वर्गातून या शाळेला चांगलं वैभव प्राप्त करून दिलं. तत्कालीन वरिष्ठ सनदी अधिकारी श्री हेमंतकुमार पवार तेंव्हा अमरावतीला अपर आयुक्त होते .त्यांच्या पुढाकाराने संस्थेला बडनेरा रोडवर चांगली जागा मिळवून दिली. प्रशस्त इमारत उभी झाली आणि प्रयास या मुला मुलींसाठी एक प्रामाणिक प्रयत्न विकसनशील झाला आहे .यात बबन बेलसरे यांचा सिंहाचा वाटा आहे .खरं म्हणजे अशा प्रकारे काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचं असते .बबनरावांनी ते काम निष्ठेने केले आहे व करीतही राहणार आहेत .मला आठवते एकदा कविवर्य सुरेश भट माझ्याकडे आले होते. त्यांच्या गीत गझलांचा कार्यक्रम आयोजित करायचा होता .मी बबनरावना फोन केला. त्यांनी लगेच आपल्या घराच्या गच्चीवर त्या कार्यक्रमाचे नियोजन केले. भरगच्च कार्यक्रम झाला. आणि आदरतिथ्याच्या बाबतीत तर बबनराव काहीच कमी पडू देत नाहीत आणि देणारे नाहीत .या सगळ्या कामात त्यांना खरी साथ आहे ती सन्माननीय रेखावहिनींची.खरं म्हणजे डॉक्टर सामाजिक कार्यकर्ता विविध संघटनांचे पदाधिकारी ही तारेवरची कसरत बबनराव सांभाळू शकतात ते रेखावहिनीमुळेच. आमच्या सर्व चळवळीमध्ये ते आनंदाने सहभागी होतात .साहित्य संगम, बहुजन साहित्य परिषद, डॉ पंजाबराव देशमुख अकादमी, मिशन आयएएस, विदर्भ सत्यशोधक मंडळ जिगिषा,प्रयास अशा कितीतरी संस्थांची नावे घेता येतील. बबनरावकडे वर्गणी मागायला गेलेला माणूस कधी परत येत नाही. आपल्या परीने ते मदत करतातच. कधी कधी ही मदत मोठ्या प्रमाणात असते. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे .खरं म्हणजे बबनराव आज एवढे मोठे धन्वंतरी होण्यामध्ये त्यांच्या मित्रांचा मोठा सहभाग आहे.
वलगावला शिकल्यानंतर त्यांनी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. पण त्यांना इंग्रजी नीट समजत नव्हते .इंग्रजी मधून शिकवले जात होते आणि आपल्याला काही समजत नाही म्हणून ते विदर्भ महा.च्या वस्तीगृहातून पळून वलगावला गेले .त्यांचे मित्र बबन राऊत व पुरुषोत्तम यांनी वलगावला जाऊन त्यांना परत वस्तीगृहात आणले. परत तोच प्रकार झाला. बबनरावांना इंग्रजी समजत नव्हते .इंग्रजी अवघड जात होते. पण हे मित्र विक्रम और वेताळसारखा त्यांचा पाठलाग करीत गेले व त्यांना परत वस्तीगृहात आणले व कदाचित दम दिला असेल की आता पळून जायचे नाही. बबनराव डॉक्टर झाले त्यांना परत आणणारे एक मित्र वकील झाले .एक मित्र सामाजिक चळवळीत यवतमाळला काम करीत होते. आज ते दोन्ही मित्र नाहीत. परंतु त्यांनी डॉक्टरांना खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस बनवले आहे .खरं म्हणजे जीवनात मित्रांचे स्थान किती महत्त्वाचे असते हे बबनरावांच्या मित्रांनी सिद्ध करून दाखवले आहे .आजही बबनराव जेव्हा आपल्या मित्रांची आठवण काढतात तेव्हा त्यांना गहिवरून येते. एक मित्र यवतमाळला होते .एक मित्र दारव्ह्याला होते .या मित्रांना भेटायचा योग यायचा. तेव्हा मैत्री काय असते कशी असते याचा प्रत्यय यायचा. आता अमरावती शहरातील साहित्य नाटक अंधश्रद्धा निर्मूलन या सर्वच चळवळीमध्ये बबनराव अग्रेसर आहेत. श्याम मानवांना कोणतताही कार्यक्रम घ्यायचा असला तर ते पहिला फोन डॉक्टर बबनरावांनाच करतात आणि प्रा.शाम मानवचा फोन आला की डॉ. बबन बेलसरे सर्व कामे करतात. अगदी सांस्कृतिक भवन बुक करण्यापासून तर श्याम मानव अमरावती शहरातून जाईपर्यंत. श्याम मानव देखील आपल्या भाषणामध्ये आपल्या बोलण्यामध्ये बबनरावांचा आवर्जून उल्लेख करतात. खरं म्हणजे आपला डॉक्टर व्यवसाय सांभाळून ही सगळी कामं करणे अवघड काम .पण या माणसाला आता त्याची सवय झालेली आहे .आमच्या ह्या मित्राचा आज वाढदिवस .या वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून शुभेच्छा.
==============
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती 9890967003

 

संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा