You are currently viewing ‘वंदे भारत’ देशाला गतिमान करणारी रेल्वे क्रांती! – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

‘वंदे भारत’ देशाला गतिमान करणारी रेल्वे क्रांती! – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

‘वंदे भारत’ देशाला गतिमान करणारी रेल्वे क्रांती! – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी 

 महाराष्ट्र आणि गोव्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. वंदे भारत रेल्वेच्या शुभारंभाचा हा ऐतिहासिक क्षण देशाच्या प्रगतीला पूरक ठरणारा व या दोन राज्यांच्या पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे हे स्वप्न पूर्ण केले केले असून, देशाला गतिमान करणारी रेल्वेतील ही क्रांती आहे. ही क्रांती  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळे शक्य झाली आहे, असे उद्गगार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले पर्यटकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांची लाईफ लाईन असलेली रेल्वे आणखी मजबूत झाली आहे. देशातील दळण वळणाचे साधन आणखी गतिमान झाले आहे.

     गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सवरून हिरवा झेंडा दाखवून वंदे भारत चा शुभारंभ करत, देशभरातील नागरिकांसाठी ही आलिशान हायस्पीड ट्रेनचे लोकार्पण केले.

         यावेळी गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मडगाव रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग घेतला. गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खौटे, मडगावचे आमदार दिगंबर कामत, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, कोकण रेल्वे चे व्यवस्थापकीय संचालक  संजय गुप्ता गोवा व महाराष्ट्र राज्याचे अधिकारी रेल्वेचे अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोव्यातील नागरिकांनी या सोहळ्यात उस्फूर्त सहभाग घेतला.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वंदे भारतचे कणकवलीत स्वागत

            गोव्यातील मडगाव रेल्वे स्टेशन येथून निघालेली वंदे भारत ही ट्रेन कणकवली स्टेशनवर थांबली. पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे या ट्रेनमधून मडगाव येथून आले होते. कणकवली येथे त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी वंदे भारत चे स्वागत केले. यानंतर ती मुंबईकडे रवाना झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा