वेंगुर्ला
जिल्ह्यात असणारी रक्ताची मागणी लक्षात घेता वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस कडून ग्रामपंचायत तुळस च्या सहकार्याने सलग २२ व्या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरासाठी सावंतवाडा उत्कर्ष कला क्रीडा मंडळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला सहयोगी संस्था आहेत. लाईफ टाईम हॉस्पिटल,पडवे रक्तपेढी च्या सहकार्याने श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस (श्री देव जैतिराश्रीत संस्था मुंबई चे बहुउददेशीय सभागृह) येथे रविवार दिनांक ०२ जुलै २०२३ सकाळी ९.०० वाजता आयोजित केलेल्या या रक्तदान शिबरास जास्तीत जास्त रक्तदात्यानी उपस्थित राहून रक्तदान करून या ईश्वराधिष्ठित कार्यात सहभागी व्हावे आणि नाव नोंदणीसाठी महेश राऊळ (९४०५९३३९१२) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन सरपंच रश्मी परब आणि प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री विवेक तिरोडकर आणि उत्कर्ष कला क्रीडा मंडळ चे अध्यक्ष अरुण सावंत यांनी केले आहे.