You are currently viewing “वंदे भारत” एक्सप्रेस उद्या पासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार…

“वंदे भारत” एक्सप्रेस उद्या पासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार…

“वंदे भारत” एक्सप्रेस उद्या पासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार…

बहुचर्चित ठरलेली वंदे भारत एक्सप्रेस अखेर उद्यापासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमाद्वारे मडगाव रेल्वेस्टेशनवर या गाडीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. यापूर्वी २ जूनला या एक्सप्रेसचे उद्घाटन होणार होते. मात्र ओडिसा येथे मोठा रेल्वे अपघात घडल्यामुळे हे उद्घाटन अचानक रद्द करण्यात आले होते. मात्र अखेर तारीख ठरली असून सकाळी साडेनऊ वाजता हे उद्घाटन होणार आहे. यावेळी श्री. मोदी वंदे भारतला “हिरवा झेंडा” दाखवणार आहे. यात आणखी पाच गाड्यांचा समावेश आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा