You are currently viewing सावली

सावली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेचे कवी श्री वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सावली*

********

जरी मी चालतोही एकटा

असे तुमची सावली सोबती

धरुनीया बोट जन्मदात्यांचे

कृपाळु , चालवितो सुखांती…

 

भेटता सहृद तुम्हासारखे

रुजली अंतरी भावप्रीती

अरुपाचे रूपडेही आगळे

दृष्टांत सावलीत उजळीती…

 

सत्कर्मे अनुभवता दुनिया

सावलीत ब्रह्मानंदी तृप्ती…

जे जे पेरावे ते तेच उगवते

कृतज्ञतेतुनी ओसंडते मुक्ती…

 

अशा भावनांच्या प्रेमादरात

सावलीसंगे निर्मली मन:शांती…

प्रांजळ प्रेमची सदा देत रहावे

फुलवित जावी निष्पाप प्रीती…

 

************************

*रचना क्र. ५६ / २५ / ६ / २०२३*

*©️ वि.ग.सातपुते.(भावकवी )*

*📞 ( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा