You are currently viewing आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा २७ जून रोजी कणकवलीत

आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा २७ जून रोजी कणकवलीत

तक्रारी व सूचना बैठकीत मांडा ; आम.नितेश राणे यांचे आवाहन

कणकवली

कणकवली- देवगड – वैभववाडी या तीनही तालुक्यांच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा उपविभागीय अधिकारी जगदिश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार २७ जून २०२३ रोजी दुपारी १ वाजता तहसीलदार कार्यालय कणकवली येथे आयोजित केली आहे.आपत्ती व्यवस्थापन बाबत जनतेच्या काही तक्रारी अथवा सूचना असल्यास २७ जून रोजीची बैठकीत मांडाव्यात असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

यावर्षी उशिराने आगमन झालेल्या मान्सूनच्या पावसाने २३ जून २०२३ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार सुरुवात केली असून हवामान विभागाने जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होणार असल्याची सूचना दिली आहे. त्यानुसार जोरदार पाऊस व वादळी वारे यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून आम. नितेश राणे यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये जनजीवन विस्कळीत होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे.

त्याचप्रमाणे कणकवली, देवगड व वैभववाडी या तीनही तालुक्यांच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा उपविभागीय अधिकारी श्री. कातकर यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार २७ जून २०२३ रोजी दुपारी १ वाजता तहसीलदार कार्यालय कणकवली येथे आयोजित केली आहे. आपल्या मतदार संघातील जनतेला अतिवृष्टी व आपत्ती कालावधीत कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा