You are currently viewing तुझ्या भक्तित रंगलो

तुझ्या भक्तित रंगलो

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या लेखिका कवयित्री कविता वालावलकर लिखित अप्रतिम भक्ती रचना*

*तुझ्या भक्तित रंगलो*

पांडुरंग भेटीसाठी
व्याकुळले माझे मन
दर्शनाची वाट आता
बघतो मी हर क्षण

जीवा लागलेली आस
सुटला हा सारा संग
तुझ्या भक्तित रंगलो
गात आहे मी अभंग

सुखदुःख, मोहमाया
नको काही मला आता
तुझ्या चरणी मी लीन
तूच माझा देव त्राता

पामर मी दीन देवा
भटकलो आता खूप
स्वार्थ मनी बाळगून
शोधीयले खूप सुख

आठवण येता अश्रू
आले हे माझे दाटून
दर्शनाची वाट आता
बघते मी हर क्षण

सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी , कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा