You are currently viewing निसर्गदत्त महाराज भक्ती ज्ञान केंद्रातर्फे आरोग्य केंद्रांना संगणक व एसी प्रदान!

निसर्गदत्त महाराज भक्ती ज्ञान केंद्रातर्फे आरोग्य केंद्रांना संगणक व एसी प्रदान!

मालवण :

कांदळगाव येथील निसर्गदत्त महाराज भक्ती ज्ञान केंद्रातर्फे मालवण तालुक्यातील शासकीय वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या मालवण ग्रामीण रुग्णालय तसेच पेंडुर कट्टा, मसुरे, आचरा, चौके, गोळवण, हिवाळे, या प्राथमिक आरोग्य केंद्रांना एकूण सात संगणक व पाच एअर कंडीशनरचे लोकार्पण कराण्यात आले.

कांदळगाव येथे भक्ती ज्ञान केंद्रात वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. निसर्गदत्त महाराज भक्ती ज्ञान केंद्रातर्फे विविध सामजिक उपक्रम राबविले जातात. लोकोपयोगी कामे व्हावीत यासाठी या केंद्राच्या माध्यमातून मलवण तालुक्यातील नेत्रविशारद डॉ. मधुकर ठाकूर, रमेश करंगुटकर, रमेश आचरेकर यांच्या सहकार्याने येथील आरोग्यकेंद्रांना संगणक व एअर कंडिशनर देण्यात आले. या साधनांच्या सहाय्याने आरोग्य केंद्रांना काहीशी बळकटी आल्याने सामान्य जनतेला त्याचा अप्रत्यक्ष फायदा होईल. असे यावेळी डॉ. संजय पोळ यांनी सांगितले. यावेळी डॉ. स्वप्नील बोदमवाड, डॉ. कपिल मेस्त्री, डॉ. दिप्ती सुर्यवंशी, डॉ. प्रणव पोळ, आरोग्य विस्तार अधिकारी सूरज बांगर, आरोग्य सहाय्यक राजाराम परब, व्ही सी पारकर, आरोग्य सेविका के पी तोरसकर, दीपक भोगले, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा