ओरोस
जिल्ह्यातील दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांना नीट,जेईई, सायन्स कॉलेजमधील विदयार्थ्याना मोफत करियर मार्गदर्शन करण्यासाठी प्रख्यात डॉ. महेश अभ्यंकर यांचे उपस्थीतीत ओरोस येथील ईच्छापूर्ती मंगल कार्यालय सभागृहात उद्या दिनांक २५ जून रोजी सकाळी १० वाजले पासून तिनतासाचे करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे या शिबिरात विद्यार्थ्यांबरोबर पालकांचाही सहभाग आवश्यक आहे तरी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शुभारंभ अकॅडमीचे सुरज चक्रवर्ती, सारा चक्रवर्ती यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आवाहन केले आहे.
सिंधुदुर्ग नगरी येथील ओट्रा बिल्डिंग मध्ये शुभारंभ अकॅडमीच्या कार्यालयात मार्गदर्शन शिबिर बाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केले होते, यावेळी शुभारंभ अकॅडमीचे सुरज चक्रवर्ती, सारा चक्रवर्ती, नीरज सिंग ,अभिषेक तिवारी, के डी यादव आदींसह उपस्थित होते यावेळी बोलताना चक्रवर्ती म्हणाले विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी जेई, नीट ,सायन्स कॉलेज मधून योग्य दिशा देणारे मार्गदर्शन आवश्यक आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या या मार्गदर्शन शिबिरासाठी डॉक्टर महेश अभ्यंकर याचेउपस्थीत डॉक्टर व इंजिनिअर होणाऱ्या मुलांसाठी देशातील आयआयटी, एनआय टी , ऑलमस सारख्या नामवंत विद्यापीठातून डॉक्टर्स, इंजिनियर होण्याकरिता भारत सरकार मार्फत जेईई, निट हि प्रवेश परीक्षा दरवर्षी आयोजित केली जाते. सदर परीक्षेबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कोकणातील विद्यार्थ्यांना बऱ्याच कमी प्रमाणात माहिती आहे. शिवाय अभ्यासक्रम,आणि त्यासाठी वेळेचं नियोजन यात मुलांचा गोंधळ उडतो. त्यासाठी, सिंधुदुर्ग -मालवण चे सुपुत्र व मुंबईचे ख्यातनम डॉक्टर डॉ. महेश अभ्यंकर हे कोकणातील/ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सदर परीक्षेत उत्तम यश कसं मिळवावं, याकरिता सामाजिक बांधिलकी व सेवाभावी वृत्तीने , इयत्ता १० वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन तासांचा सेमिनार घेवून मार्गदर्शन करणांर आहेत.
डॉ. महेश अभ्यंकर हे एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असून ते मालवण चे सुपुत्र आहेत. टोपीवाला कनिष्ट महाविद्यालयाचे १९९१ च्या बॅच चे सिंधुदुर्ग जिल्यातून प्रथम क्रमांकाने पास झालेले विद्यार्थी असून त्यांनी जिल्हा मुंबईच्या SETH GS medical College (केईम रुग्णालय, मुंबई परेल) मधून आपली वैद्यकीय पदवी संपादन केली. त्यांची अतिदक्षता विभाग आणि औषध निर्माण क्षेत्रात उत्तम कामगिरी आणि दांडगा अनुभव आहे. डॉ महेश अभ्यंकर अनेक अवार्ड प्राप्त व उत्कृष्ट वक्ता असून, वैद्यकीय सल्लागार, औषध निर्माण तज्ञ, लेखक, सामाजिक सेवक सुमारे १५+ एनजीओ साठी काम करतात व्यवस्थापकीय सल्लागार अस अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी देशात व परदेशात बऱ्याच ठिकाणी सुमारे १५०० पेक्षा जास्त सेमिनार घेतले असून, देश विदेशातील अनेक विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. कोवीड मध्ये उत्कृष्ट काम केल्याने त्यांना मा. राज्यपाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे आपल्या मुलीला निट परीक्षेत मोठं यश मिळाल्यानंतर ते निट आणि जेईई च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि दिशा देण्याचे काम स्वप्रेरणेने करतात.
कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांप्रती त्यांना असलेली आत्मीयता,यामुळे ते ओरोस येथे बहुमूल्य मार्गदर्शन करण्यासाठीच खास मुंबईहून येतआहेत. त्यांच्या ३ तासाच्या सेमिनार मध्ये जेईई, निट परीक्षेबाबत मुलांना पोषक आणि आवश्यक माहिती देणार आहेत.
तरी सिंधुदुर्ग जिल्यातील इच्छुक विद्यार्थी आणि पालक मोफत मार्गदर्शन आहे .तरी या सुवर्ण संधीचा जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे .