You are currently viewing आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व प्राथमिक शाळांना वह्या व शालेय वस्तूचे वाटप

आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व प्राथमिक शाळांना वह्या व शालेय वस्तूचे वाटप

वैभववाडी :

 

वाभवे – वैभववाडी शहरातील सर्व प्राथमिक शाळांना आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संताजी रावराणे यांच्यातर्फे वह्या व शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले.

वाभवे – वैभववाडी नगरपंचायत हद्दीत येणा-या दत्त विद्या मंदिर शाळा नं. १ व वि. मं. वाभवे प्रशाला मधील सर्व मुलांना वह्या, शालेय वस्तू चे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा नेहा माईणकर, भाजपा महिला तालुकाध्यक्षा सौ. प्राची तावडे, महिला बालकल्याण सभापती नगरपंचयात सौ. यामिनी वळवी, नगरसेवक सुभाष रावराणे, माजी नगरसेवक संताजी अरविंद रावराणे, प्रशालेच्या मुखाद्यापिका शाळेचे सौ. दिप्ती पाटिल, आशिष रावराणे, शिक्षक व कर्मचारी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा