हजारो कार्यकर्ते वाढदिवसाच्या कार्यक्रमात झाले सहभागी
शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना केले खाऊचे वाटप
रक्तदान करून कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली, छत्र्यांचे केले वाटप
कणकवली
भाजप नेते आणि प्रवक्ते आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात आले. छत्र वाटप शैक्षणिक साहित्य वाटप रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे गरजूंना आर्थिक आणि वेगवेगळ्या पद्धतीने मदत करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी आमदार नेते श्रावण यांचा वाढदिवस महोत्सवाप्रमाणे साजरा केला रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळ वाटप केले तर शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले बाजारपेठेंच्या ठिकाणी काउंटर लावून जिलेबी चे वाटप करण्यात आले. एकूणच आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने महत्वपूर्ण ठरला.
सिंधुदुर्ग भाजपा सरचिटणीस मनोज रावराणे यांच्यावतीने वैभववाडी तालुक्यातील भाजपा बुथ अध्यक्ष व शक्ति केंद्रप्रमुख यांना छत्र्यांचे वाटप करण्यात केले. बुथ अध्यक्ष व शक्ति केंद्रप्रमुख यांची बैठक येथील भाजपा कार्यालयात माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत पार पडली.