कणकवली
दिगवळे रांजणवाडी येथे सेलम जातीची हळद 20जणांचा गट करून सामूहिक शेती करण्याचा निर्धार श्री येरम साहेब व ब्रिगेडयर श्री.सुधीर जी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 21रोजी घेण्यात आला.त्यावेळी अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळालेल्या सौ.केरे मॅडम यांचा सत्कार श्री. ब्रिगेडयर सुधीर सावंत यांच्या हस्ते करण्यात आला,नंतर शाळेतील होतकरू मुलांना दफ्तर वाटप करण्यान आले.
सिंधुरत्न योजनेतून घेण्यात येणऱ्या land आर्मी प्रमुख श्री.गौरव गावडे यांची निवड करण्यात आली,हे सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच करण्यात आले.यात ब्रिगेडयर सुधीर सावंत यांनी सामूहिक शेती व समृद्ध गाव या संकल्पनेतून यशस्वी शुभारंभ केला आहे,यावेळी उपजिल्हाप्रमुख श्री. महिंद्र सावंत, येरम साहेब, माजी उपसरपंच नाना गावडे,श्री.काजरेकर साहेब, येरम बंधू,आदी दिगवले गावातील लोक उपस्थित होते