_*10वी /12वी नंतर विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची संधी..*_
_दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची संधी उपलब्ध असून तीन वर्षांच्या पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. शासनाने पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ दिली असून इच्छुक विद्यार्थी 30 जूनपर्यंत जवळच्या प्रवेश सुविधा केंद्रावर नाव नोंदणी करू शकतात._
_यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक, सावंतवाडी येथे महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिकृत प्रवेश सुविधा केंद्र (FC 3470) उपलब्ध असून या ठिकाणी 30 जूनपर्यंत प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी व अर्ज भरण्याची निश्चिती करण्यात येईल._
_*पॉलिटेक्निककडे पुन्हा विद्यार्थ्यांचा वाढला कल…*_
_पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वाढत आहे. तंत्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत असल्याने पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. मागील तीन वर्षात पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशात 20 ते 25 टक्क्यांची प्रवेश वाढ झाली आहे ._
_यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक हे कोकणातील एकमेव एनबीए मानांकित (NBA Accredited) पॉलिटेक्निक कॉलेज असून या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत._
_प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य गजानन भोसले यांनी केले आहे._