You are currently viewing हरकुळ खुद हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

हरकुळ खुद हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

हरकुळ खुद हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सोहळा संपन्न

कणकवली / पूनम राटूळ : हरकुळ खुर्द विद्यामंदिर च्या वतीने शालांमध्ये परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभ गुरुवार दि.२० ऑगस्ट २०२० रोजी सोशल डिस्टन्स ठेवून व मास्क लावून करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष विठ्ठलराव शिवाजी रासम (अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई) तसेच अँड. प्रभाकर काशिराम वालावलकर (जनरल सचिव शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई )तसेच विदिशा विठ्ठल तेली (सरपंच) व संजय रामचंद्र रावले (उपसरपंच) हरकुळखुर्द ग्रामपंचायत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर अनंत यादव यांनी केले. सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देवून सत्कार केले. प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रशालेतील २६ विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत पास झाले. तर १० विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले. सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.सावंत मॅडम यांनी केले तर बक्षिसांचे वाचन श्री.गोगुर्डे सर यांनी केले प्रशालेतील प्रथम क्रमांक ऐश्वर्या आत्माराम तेली ९४.४० टक्के गुण मिळवले तिचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलराव शिवाजी रासम यांनी रोख रक्कम ‘प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देवून सत्कार केला. तसेच प्रशालेतून द्वितीय क्रमांक सिद्धी प्रमोद मासये ९२.४० टक्के गुण मिळवले तिचा सत्कार अॅड. प्रभाकर काशिराम वालावलकर यांनी रोख रक्कम ‘प्रशस्तीपत्र’ व गुलाब पुष्प देवून केले. तसेच प्रशालेतून तृतीय क्रमांक दिक्षा दशरथ बाणे ९१.६० टक्के गुण मिळवून तिचा सत्कार विदिशा विठ्ठल तेली सरपंच यांनी रोख रक्कम ‘प्रशस्तीपत्र’ व गुलाब पुष्प देवून सत्कार केला. तसेच प्रथम दहा विद्यार्थ्यांचा सत्कार रोख रक्कम व गुलाबपुष्प देवून करण्यात आला व इतर विद्यार्थ्यांना दानशूर व्यक्तींनी ठेवलेल्या रक्कमेतून आलेल्या व्याजातून पेनसेट बक्षीस देण्यात आले. तसेच माननीय अध्यक्ष व माननीय जनरल सचिव यांनी मुलांना पुढील शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच शालेय समिती अध्यक्ष विलास वासुदेव रासम, सभासद विद्याधर गोपाळ वालावलकर, जयप्रकाश तुकाराम हुले, प्रकाश सहदेव दळवी उपस्थित होते. हरकुळखुर्द शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे सभासद मोहन सखाराम रासम गंगाधर दत्तात्रय रासम हे उपस्थित होते. तसेच शालेय समिती अध्यक्ष विलास व संजय रावले यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आभार पवार सर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा