You are currently viewing वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग नगरपंचायतींसाठी 26 नोव्हेंबर पर्यंत हरकती व सूचना नोंदवाव्यात…

वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग नगरपंचायतींसाठी 26 नोव्हेंबर पर्यंत हरकती व सूचना नोंदवाव्यात…

…जिल्हाधिकारी  के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यातील वाभवे-वैभववाडी नगरपंचायत व कसई-दोडामार्ग नगरपंचायत या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपरिषद क्षेत्रातील एक सदस्यीय पद्धतीने प्रभागांची पुर्नरचनेबाबतचा मसुदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.

            जिल्ह्यातील वाभवे-वैभववाडी नगरपंचायत व कसई-दोडामार्ग नगरपंचायत या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपरिषद क्षेत्रातील एक सदस्यीय पद्धतीने प्रभागांची पुर्नरचनेसाठी अनुसुचित जाती व अनुसुचित जमातींच्या स्त्रियांसाठी राखून ठेवायचे प्रभाग नागरीकांच्या मागास प्रभाग (स्त्रियांसाठी राखून ठेवलेला धरुन) व उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात आलेले प्रभाग दर्शविणाऱ्या आदेशाचा मसुदा अनुक्रमे क्रमांक NPA-2803/2/2020/261 दि. 12 नोव्हेंबर 2020 (वाभवे-वैभववाडी साठी)  आणि मसुदा क्रमांक NPA-2803/2/2020/264 दि. 12 नोव्हेंबर 2020 (कसई-दोडामार्ग साठी) या प्रती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर दि. 18 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्धी करण्यात येणार आहे.  तसेच सदर  प्रत वाभवे-वैभववाडी नगरपंचायत व कसई-दोडामार्ग नगरपंचायत यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत खुली ठेवण्यात आली आहे.

            याबाबतच्या काही हरकती व सूचना असल्यास त्या लेखी स्वरुपात संबंधित नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या नावे गुरुवार दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत पोहोचेल असे पाठवावेत, यानंतर प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचा विचार केला जाणार नाही. तसेच राज्य निवडणुक आयोगाने प्राप्त हरकती व सुचनांची सुनावणी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. तरी संबंधित क्षेत्रातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा