फोंडाघाट मध्ये श्रीराम जन्मभुमी अयोध्या निर्माण मुर्ती प्रतिष्ठापना समारंभाचे निमंत्रण आणि अक्षता प्रदान

रॅलीत असणार 1000 लोकांचा सहभाग

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये २२ तारीखला होणाऱ्या श्रीराम जन्मभुमी अयोध्या निर्माण मुर्ती प्रतिष्ठापना समारंभाचे निमंत्रण आणि अक्षता प्रदान कार्यक्रमा निमीत्त एस.टी.स्टँड ते ग्रामपंचायात रॅलीचे नियोजन भा.जप.च्या वतीने करण्यात आले. उपसरपंच सर्व सदस्य मामा हळदिवे,  राजन चिके, विश्वनाथ जाधव, विलास लाड यांनी भाग घेतला. बाजारपेठमध्ये या कार्यक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले. अजित नाडकर्णी यांनी आपल्या दुकानात निमंत्रण स्विकारले. आणि सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. फोंडाघाट मधुन १००० लोक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.